Breaking News

घरोघरी तिरंगा अभियानाबाबत महिला दक्षता समितीला सूचना

पनवेल : वार्ताहर

तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान राखून घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा) या देशव्यापी अभियानात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीनेसुद्धा सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनिका चौधरी, एस. आय. संजय धारेराव यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत महिला दक्षता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने महिला सदस्य उपस्थित होत्या. या वेळी त्यांना घरोघरी तिरंगा या अभियानासंदर्भात माहिती देण्यात आली, तसेच जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्यासाठी आवाहनसुद्धा करण्यात आले आहे, तसेच आवश्यक त्या सूचना त्यांना या वेळी देण्यात आल्या.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply