Breaking News

कर्जतमध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढली

कर्जत : बातमीदार                              
कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली असून अतितीव्र म्हणजे सॅम श्रेणीमधील बालकांची संख्या 29, तर तीव्र कुपोषित अर्थात मॅम श्रेणीतील बालकांची संख्या तब्बल 140वर पोहचली आहे. आदिवासी भागातील ही वाढती आकडेवारी धोक्याची मानली जात आहे.
कर्जत तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी खांडस, कळंब, आंबिवली या तीन ठिकाणी सर्वाधिक आदिवासीबहुल भाग आहे. त्यानंतर काही प्रमाणात नेरळ, मोहाली आणि कडाव या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती आहे. तेथील आदिवासींचे जीवनमान उंचवावे म्हणून काम उपयोजना करूनदेखील कुपोषण काही कमी होताना दिसत नाही. कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या अंगणवाडीमध्ये पोषण आहार घेण्यासाठी येत असलेल्या कुपोषित बालकांची संख्या 1080 एवढी आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply