Breaking News

टाळेबंदीच्या काळात आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवरील खटले मागे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पुणे : प्रतिनिधी
टाळेबंदीच्या काळात साखळी आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांवर दाखल करण्यात आलेले खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
टाळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापार्‍यांनी एप्रिल 2021मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. या दरम्यान सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नसतानादेखीलया व्यापार्‍यांवर खटले दाखल करण्यात आले होते. कोरोना काळातील हे खटले मागे घेण्याची विनंती पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर हे खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे ठोस आश्वासन फडणवीस यांनी दिले, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी गुरुवारी (दि. 11) दिली.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश फडणवीस यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले. स्वातंत्राच्या अमृत महोत्सवनिमित्ताने केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा अभियानामध्ये व्यापारी सहभागी होणार आहेत. आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून सर्व व्यापार्‍यांनी अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे. व्यापार्‍यांनी 13 ते 15 ऑगस्टपर्यंत आपआपल्या घरी तिरंगा फडकवावा. दुकानांवर रोषणाई आणि सजावट करावी, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून देशाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन रांका यांनी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply