पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 19चे अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत (राजू) सोनी यांनी सुशिला रेसिडेन्सी येथील नागरी समस्या सोडविल्याबद्दल त्यांचा विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सुशीला रेसिडेन्सिला गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न, तसेच ड्रेनेजचा प्रश्न, गटाराचा प्रश्न भेडसावत होता. या संदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांना या नागरी समस्येची माहिती दिली. नगरसेवक सोनी यांनी तत्परतेने त्यांच्या समस्या निकाली काढल्या. याबद्दल सुशीला रेसिडेन्सितर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, विभा चव्हाण, सचिन करपे यांसह इतर सदस्यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा सत्कार केला.