धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील रोठ बु. येथील धाटाव एमआयडिसीतील फायरस्टेशन समोर कॅपरस कॉलनीतील फार वर्षांपुर्वीचे पिंंपळा खालच्या जुन्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग व फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके याच्या माध्यमातून हा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम करण्यात आला.
रोठ बु. गावाजवळ कॅपरस कॉलनीच्या समोर फार वर्षांपूर्वी जुने आश्वत्थ मारुती मंदिर होते. गेली अनेक वर्षांपासून मंदिर जीर्णअवस्थेत होते. परंतु राजमुद्रा फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नव्याने सर्व सुविधा संपन्न असे सुसज्ज मंदिर बांधण्यात आले. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम करण्यात आले. धाटाव परिसरात दरवर्षी राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येते.
पवनपुत्र मारुतीचे दर्शन भाजप जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, रोहा तालुक्यातील हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद अष्टेकर, पत्रकार राजेंद्र जाधव, अशोक कंपनीचे मॅनेजर, दीपक नाईड्रेड कंपनीचे मॅनेजर कापसे, पत्रकार सचिन साळुंखे, पत्रकार रवींद्र कानेकर, नितीन वारंगे, दत्ता डाके, श्रद्धा घाग विविध ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक हनुमान भक्त त्यांनी दर्शन घेतले.