Breaking News

अतिवृष्टीमुळे घर कोसळून रोह्यात बालक गंभीर जखमी

नागोठणे : प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी झाला. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. रोहिदास घासे आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असतानाच ही घटना घडली. परीसरात रात्रभर पाऊस सुरू होता. सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिला. पावसासह वादळीवाराही सुरू असल्याने त्यातच घासे यांचे घर कोसळले. घराच्या छताचा भाग रिद्धी घासे (9) व रियांश घासे (3) यांच्यावर पडल्याने त्यात ते जखमी झाले. रियांश हा गंभीर जखमी झाला आहे. शेजार्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply