रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग-रेवदंडा मार्गावर बागमळा येथे बुधवारी (दि. 13) सकाळी जेएसडब्ल्यू कंपनीची बस आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही बसचालकांसह एकूण 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुरूड आगाराची एसटी बस रेवदंडामार्गे मुंबईकडे निघाली होती. ही बस अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावर बागमळा येथील शारदा पेट्रोल पंपाजवळ आली असता तिची आणि अलिबागहून साळाव जेएसडब्ल्यू कंपनीत जाणार्या बसची धडक झाली. या अपघातात दोन्ही बसमधील 16 जण जखमी झाले असून यातील एक गंभीर जखमी आहे. जखमींवर अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अलिबाग-रेवदंडा मार्गावर बागमळा येथे शारदा पेट्रोल पंपाजवळ असलेले वळण धोकादायक आहेत. या ठिकाणी अनेकदा अपघात होतात. या वळणाची तीव्रता कमी करावी, अशी मागणी केली जात आहे.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper