ज्येष्ठांसाठी चावडीचे लोकार्पण
कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली परिसरातील पायाभुत सुविधांचा दर्जा हा आणखी उंचावलेला दिसून येईल, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते कळंबोलीत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी केलेल्या चावडीच्या लोकार्पणावेळी बोलत होते.
पनवेल महापालिकेच्या माध्यामातून महापालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रभाग समिती ‘ब’च्या माजी सभापती प्रमिला पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून कळंबोली सेक्टर 12 येथील हनुमान मंदिरा शेजारी आणि अमृत सोसायटी जवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी चावडी बांधण्यात आली आहे. या चावडीचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले.
या लोकार्पणावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा मंडळ सरचिटणीस दिलीप बीस्ट, महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, दुर्गा सहानी, प्रियंका पवार, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष केशव यादव, अशोक मोटेे, आबा घुटुकडे, संदीप भगत, मच्छिंद्र कुरुंद, विजय नवले, देविदास खेडकर, विजय पाटील, कल्पेश वैद्य, चांद पाशा, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, ही फक्त छोटीशी सुरुवात असून, येणार्या काळात कळंबोली परिसरातील पायाभुत सुविधांचा दर्जा हा आणखी उंचावलेला दिसून येईल आणि ही कामे करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केले.