Breaking News

पाबळमध्ये भाजप-सेनेची विजयी सलामी ; युतीच्या ललिता दामोदर पाटील बिनविरोध, शेकापला धक्का

पेण : प्रतिनिधी

शेकापचा बाल्लेकिल्ला समजला जाणार्‍या पेण पूर्व विभागातील पाबळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 (कुरनाड) मधून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

पाबळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत असून, येथील निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती. या मुदतीत प्रभाग क्रमांक 2मधून युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे, मात्र त्याची अधिकृत घोषणा 3 सप्टेंबरला करण्यात येणार आहे.  

भाजप, शिवसेना युतीतर्फे या ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी  राजेश्री नरेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, तसेच प्रभाग क्र. 1मधून भगवान परशुराम जगम, कांचन दर्शन जाधव, प्रभाग क्र 2 मधून ललिता दामोदर पाटील (बिनविरोध), बाळू गजा शिंदे, मीनाक्षी रामदार लोभी, प्रभाग क्र 3 भिमा दामोदर बांगारे, संतोष दगडू भस्मा, प्रियंका दिपेश ओहाळ, प्रभाग क्र. 4 पिंट्या पुतळ्या दोरे, जयंवती बाळ्या लेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ग्रामपंचायत सदस्यपदासाठी बिनविरोध निवड झाल्याबद्दल  ललिता दामोदर पाटील यांचे भाजपचे युवा नेते वैकुंठ पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, पाबळ विभाग प्रमुख नरेश शिंदे, लहूशेठ पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अशोक शिर्के, शिवाजी पाटील, रविकांत म्हात्रे, बुधाजी पिंगळा, नाथ शिंदे, दिनेश काडगे आदींनी अभिनंदन केले आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply