Breaking News

पंतची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

लंडन ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्यासोबत थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याच्यासह भरत अरुण व राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांना विलगिकरणात जावे लागले होते. आता रिषभची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे आणि तो 22 जुलैला भारतीय संघासोबत सरावाला सुरुवात करेल.
पंत आता टीम इंडियासह सरावाला सुरुवात करेल, पण तो पहिल्या सराव सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे आणि तो दुसर्‍या सराव सामन्यात खेळेल. 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होईल आणि त्यात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. अभिमन्यू,
वृद्धीमान आणि भरत अरुण यांचा क्वारंटाईन कालावधी 24 जुलैला संपणार आहे आणि या तिघांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. 28 जुलैला दुसरा सराव सामना सुरू होणार आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply