Breaking News

ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त – शिक्षक दिनानिमित्त  चेतना पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेतच, परंतु वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या बुध्दिमत्तेच्या विकासासाठी उत्साहाने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमधून अशा वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरिता प्रोत्साहन दिले जाते. यावर्षी चेतना पब्लिकेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त ही ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा होता.

यश आनंत पांडव (9वी ब) विषय विज्ञान आणि गणित बक्षिस रोख रक्कम 2000 रुपये, अभिषेक साळुंखे (9वी अ) विषय गणित बक्षिस रोख रक्कम 1300 रुपये, अदित्य आनंद कुलकर्णी (9वी अ) विषय इंग्रजी बक्षिस रोख रक्कम 350 रुपये, प्राची ज्ञानेश्वर पाटील (9वी ब) विषय इंग्रजी बक्षिस रोख रक्कम 350 रुपये, हार्दिक सुनिल मोरे (10वी क) विषय इंग्रजी बक्षिस रोख रक्कम 702 रुपये, अशी स्पर्धेतील विजेत्यां विद्यार्थ्यांची नावे आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी.  देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी,  मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांजकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply