पनवेल : वार्ताहर
हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यामार्फत शनिवारी (दि. 6) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी येथे आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळाचे महत्त्व जाणून घेऊन शाळेच्या मागणीनुसार विविध प्रकारचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
या साहित्यात क्रिकेट सेट, लगोरी, कॅरम सेट, दोरी उड्या, सापसिडी, व्यापारसेट, फुटबॉल, हॉलीबॉल, टेबल टेनिस, लेझीम, बॅडमिंटन व उजळणीची पुस्तके शाळेच्या ताब्यात देण्यात आली.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पायरे, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव वसंत मोरे, जगन्नाथ पायरे, मंगेश मोरे, अजित मोरे, शैलेश जगताप, अविनाश मोरे, वसंत भागवत, गणेश खंडागळे, चंद्रकांत भागिवंत, प्रवीण मोरे, नथुराम जगताप, संदीप मुंढे व कोळंबेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक राजेंद्र पायरे, रमेश वावळे व गणेश कुताल सरांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. संतोष जाधव व वसंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रमेश वावले यांनी तर उपस्थितांचे आभार गणेश कुतांल यांनी मानले व विशेष सहकार्य अविनाश मोरे यांनी केले.