Breaking News

आमदार मंदा म्हात्रे यांची तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार

बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सीबीडी बेलापूर ते सानपाडा पामबीच मार्गावर आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली.

भाजपा कार्यकर्ते व तरुण युवकांच्या शेकडो दुचाकी व चार चाकी वाहने तसेच नवी मुंबई ऍम्ब्युलन्स सेवा संस्थेच्या 13 अँब्युलन्स तिरंगा झेंडा घेऊन तिरंगा यात्रेत सहभागी झाली होती.

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, सभागृह नेते रविंद्र इथापे, माजी सभापती संपत शेवाळे, डॉ. जयाजी नाथ, नेत्रा शिर्के, साबु डॅनियल, शुभांगी पाटील, अशोक गुरखे, शिल्पा कांबळी, विशाल डोळस, दीपक पवार, सुनील पाटील, गोपाळ गायकवाड, बेलापूर विधानसभा संयोजक- भाजपा महामंत्री निलेश म्हात्रे, डॉ. दीपक बैद, जगन्नाथ जगताप, रवी म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, सुहासिनी नायडू, जयश्री चित्रे, शशी भानुशाली, भरत जाधव, पांडुरंग आमले, जनार्दन सुतार तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply