खोपोली : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यासाठी येथील इंव्होसिंथ केमिकल कंपनीने पुढाकार घेतला असून, बुधवारी या नियोजीत स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन
करण्यात आले.
खोपोली बाजरपेठेत प्रशस्त स्वच्छतागृह निर्मितीसाठी इंव्होसिंथ कंपनीकडून सामाजिक दायित्व ़फंडातून 30 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून बाजारपेठेमधील अग्निशामक दलाच्या प्रांगणाच्या एका बाजूला स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे -औटी, नगरपालिकेच्या आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, नगरसेवक मोहन औसरमल, सुनील पाटील, दिलीप जाधव, नगरसेविका निर्मला शेलार, मुख्याधिकारी गणेश शेटे, कंपनीचे व्यवस्थापन अधिकारी डॉ. शाहू, सहाय्यक अधिकारी रघुवीर यांच्यासह कंपनी अधिकारी व नागरिक उपस्थित होते.