अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य शासनाने 995 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात धूपप्रतिबंधक बंधारे, बहुउद्देशीय निवारा केंद्र, भूमिगत विद्युत वाहिन्या, दरडप्रवण क्षेत्रातील उपाययोजना यासारख्या कामांचा समावेश आहे.
कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वतीने राज्य सरकारकडे एक हजार 894 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. यापैकी 995 कोटींच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
वादळ, पूर, भूस्खलन, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा कोकणाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती सौम्यीकरण ही योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. यात रायगडसाठी 995 कोटींच्या कामांना निधी मंजूर करण्यात असून तो लवकरच उपलब्ध होणार आहे.
Check Also
नमो चषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत शानदार सुरुवात
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवाजी पार्क व आझाद मैदान हे राज्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील अत्यंत महत्त्वाची अशी …