Breaking News

भाजप माणगाव शहराध्यक्षपदी नितीन दसवते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

माणगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तसेच भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने पक्षाच्या माणगाव शहर अध्यक्षपदी माजी उपसरपंच नितीन रामजी दसवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
भाजपची आढावा बैठक नुकतीच माणगाव येथील खरे हॉलमध्ये झाली. या बैठकीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी मुंढे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या नियुक्तीबद्दल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नितीन दसवते म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर माणगाव शहराच्या अध्यक्षपदी धुरा विश्वासाने सोपविली असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन. केंद्रात व राज्यात आता भाजपची सत्ता असून पक्षामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवून याचा लाभ बहुजन समाजातील लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करू.
या निवडीबद्दल भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती राजेश मेहता, युवा नेते चिन्मय मोने, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष अश्विनी महाडिक, बाबुराव चव्हाण आदींनी नितीन दसवते यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply