Breaking News

50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली -मुख्यमंत्री

ठाणे ः प्रतिनिधी

गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. हे सर्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे तसेच यापुढे हे थर वाढत जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच या वेळचा गोविंदा जोरात आहे ना, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, गोविंदांना विमा दिला. सरनाईक व इतर लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली. प्रो-कबडीप्रमाणे पुढच्या वर्षी प्रो-गोविंदा होईल आणि नोकरीत पाच टक्के आरक्षणही मिळणार आहे. टेंभी म्हणजे गोविंदांची पंढरी आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेला येथील दहीहंडी उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. दिघेसाहेब बोलले होते की, ठाण्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे, असे सांगून दहीहंडी व इतरही सण-उत्सव काळजी घेऊन साजरे करा. साथीचे आजार अजून गेले नाहीत काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. या वेळी अभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होती. तिने मराठीमध्ये उपस्थितांशी संवाद साधत सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. श्रद्धाचे मराठी ऐकून उपस्थित गोविंदा पथकांनी टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply