Breaking News

खारघरच्या डोंगरावर वणवा; मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक

खारघर : प्रतिनिधी

तळोजा कारागृहाशेजारी असलेल्या डोंगरावर दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत शेकडो रोपटी जळून खाक झाली आहेत.

खारघर सेक्टर 35 तळोजा कारागृहालगत असलेल्या डोंगरावर परिसरातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोप लागवड करून संगोपन करण्याचे काम करीत आहे. डोंगरावरील झाडांची हानी होवू नये म्हणून खारघर मधील पर्यावरण प्रेमी रोपट्यांसभोवती पाणी देण्याची व्यवस्था केली आहे, मात्र सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने व्यक्तीने लावलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली.

या घटनेबाबत खारघरच्या अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता डोंगराच्या पायथ्याशी लागलेली आग अग्निशमन जवानाने विझविली, मात्र आग डोंगरमाथ्यावर पोहचली. उंचीवर अग्नी बंब जात नसल्यामुळे आग विझविताना अडचणी येत असल्यामुळे उंचीवर पोहचलो नसल्याचे सांगितले.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply