Breaking News

थकीत घरपट्टी, पाणीपट्टीसाठी मुरूड नगर परिषदेची धडक मोहीम

3 स्टॉल सील, 21 नळजोडणी तोडली

मुरूड : प्रतिनिधी

वेळोवेळी नोटीस बजावूनही घरपट्टी व पाणीपट्टी न भरणार्‍या लोकांवर मुरूड नगर परिषदेने कडक कारवाही करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे थकीत रक्कम न भरणार्‍या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मुरूड समुद्रकिनारी असणार्‍या  तीन  स्टॉलला  सील  करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी जप्तीच्या नोटिसाही लावण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, पाणीपट्टी न भरलेल्या मुरूड शहरातील 21 जणांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने केली आहे. मार्चअखेर असल्याने थकीत रक्कम तत्परतेने जमा होण्यासाठी सदरची कार्यवाही नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे.

वारंवार नोटीस बजावूनही थकीत घरपट्टी व पाणीपट्टी न भरल्याने ही कारवाई केल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात 250 थकीत पाणीपट्टी ग्राहक असून त्यामधील काही ग्राहक बाहेर असल्याने त्यांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरलेली नाही. संबंधितांना नोटिसा बजावल्या असून ही वसुली न झाल्यास पुढील जप्तीची कारवाई करणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन हाटे, अशोक तुळसकर,  अभिजीत कारभारी, सतेज निमकर, रूपेश भाटकर, मितेश माळी आदी कर्मचारी वृंदानी ही धडक कार्यवाही अमलात आणली आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून थकीत पाणीपट्टी ग्राहकांची नळ जोडणी तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यात मुख्याधिकारी दयानंद गोरे, पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरातील 21 नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली. नीलेश काते, प्रसाद जाळगावकर, राजू भायदे, उल्हास पाटील, बाळा म्हसळकर, दीपेश मसाल, आण्णा पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली. थकबाकी वसुलीसाठी 31 मार्चला अखेरपर्यंत थकबाकी रक्कम न भरल्यास दंड आकारला जाणार आहे. यासाठी आपली रक्कम लवकरात लवकर भरावी व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply