Breaking News

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी तीन हजार एसटी गाड्या आरक्षित

मुंबई : प्रतिनिधी
गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्या आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे.
कोकणासाठी गुरुवारपासून (दि. 25) 27 गाड्या तर रविवारी (दि. 28) एक हजार 241 गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने कोकणसाठी अडीच हजार जादा गाडयांची घोषणा केली होती, मात्र त्यापेक्षाही जास्त गाड्यांचे आरक्षण होत आहे. आतापर्यंत एक हजार 950 गाड्या संपूर्ण आरक्षित झाल्या आहेत, तर एक हजार 60 गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त आणखी 150 ते 200 गाड्यांचेही आरक्षण सुरू आहे.
महामंडळातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्टला 27 जादा गाडया कोकणसाठी रवाना करण्यात येणार आहेत. त्यानंतर 26 ऑगस्टला 105 , 27 ऑगस्टला 178, 28 ऑगस्टला 1 हजार 241 आणि 29 ऑगस्टला 1 हजार 445 एसटी गाड्या कोकणसाठी रवाना होतील.

पनवेल-रत्नागिरी, मडगावसाठी रेल्वेच्या 12 विशेष फेर्‍या

  • मध्य रेल्वेकडून पनवेल-रत्नागिरी, मडगावसाठी आणखी 12 विशेष फेर्‍या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल-मडगाव गणपती विशेष फेरी गाडी क्रमांक 01595 ही पनवेलमधून 4 आणि 11 सप्टेंबरला सायंकाळी पावणेपाच वाजता सुटेल. गाडी क्रमांक 01596 ही मडगावमधून 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता सुटणार आहे.
  • पनवेल-रत्नागिरी गणपती विशेष फेर्‍यांमध्ये गाडी क्रमांक 01591 ही पनवेलमधून 3 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला पहाटे 5.40 वाजता सुटेल आणि गाडी क्रमांक 01592 रत्नागिरीतून दुपारी 3.05 वाजता सुटेल.
  • पनवेल-रत्नागिरी गणपती विशेष फेरीही गाडी क्रमांक 01593 ही पनवेलमधून 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता आणि गाडी क्रमांक 01594 रत्नागिरीतून सकाळी 8.20 वाजता सुटणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply