Breaking News

शिवराज प्रतिष्ठानतर्फे भक्ती-शक्ती महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी

विभागातील आमडोशी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच भक्ती-शक्ती महोत्सव घेण्यात आला. त्यात संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. मधुकरमहाराज जवके आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार  पुष्पाताई शेलार यांना, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार प्राप्त संदीप प्रल्हाद गुरव यांना शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच सोनल रवींद्र पाटील (कोलाड) यांनाही भक्ती-शक्ती सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

नृत्य स्पर्धेतील विजेते स्वरा जांबेकर, श्रावणी जांबेकर, परी कामथे, प्राप्ती कामथे, स्पर्श कामथे, राज मनवे, करण मनवे यांना, तर इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त करणारे आमडोशीतील वेदांत जांबेकर, जयेश सुतार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बारावीत तसेच पहिली ते सातवी प्राथमिक शाळेत विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमडोशी शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र कामथे, पदाधिकारी गणेश भोसले, उदय जाधव, अनिल कामथे, राजेंद्र जांबेकर, अनंता कामथे, स्वप्निल जांबेकर, सुरेंद्र जांबेकर, स्वराज बलकावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी जाधव यांनी केले.

Check Also

पनवेल मनपा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नगररचना संचालकांशी सकारात्मक चर्चा

पुणे ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन, बांधकाम परवानग्या व …

Leave a Reply