कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली येथील आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 25) कोरोना प्रतिबंधात्मक पहिला, दुसरा व बूस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत लसीकरण शिबिरात परिसरातील 122 नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
या वेळी भाजप कलंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ चरू पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, प्रभाग 8 अध्यक्ष प्रकाश शेलार, शहर मंडळ सरचिटणीस दिलीप बिष्ट, संजय दोडके, कळंबोली शहर मंडळ उपाध्यक्ष संदीप भगत, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष केशव यादव, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव पी. एस. हातेकर, सोमनाथ बोबडे, श्रीवास्तव, कळंबोली महिला सरचिटणीस दुर्गा सहानी, कळंबोली कार्यालयीन चिटणीस जगदिश खंडेलवाल, 210 च्या बूथ अध्यक्ष सरिता बसोने, कळंबोली ऑफिस स्टाफ यशोदा लव्हटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीतील नागरिकांसाठी बुस्टर डोसची मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कळंबोलीतील नागरिकांनी धन्यवाद दिले. या शिबिरासाठी डॉ. सुरज सजगणे, अनिता गडगे नर्स, मनिषा म्हात्रे नर्स, प्रफुल दळवी यांचे योगदान लाभले.