Breaking News

गव्हाण विद्यालयात अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

गव्हाण ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिथीप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यालयच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम इ. 8वी ब वर्गाने आयोजित केला. कार्यक्रमात कपिल सोनकांबळे, ओमकार भोसले व सुजल जगदाळे या विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कार्याविषयी माहिती सांगितली.

मुख्याध्यापिका साधना डोईफोडे यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक आदर्श महिला राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन करून आपणही त्यांचे आदर्श घ्यावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दिक्षा वर्तक हिने तर आभार अभिलाषा म्हात्रे हिने व्यक्त केले. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके, इंग्रजी विषय शिक्षक सागर रंधवे, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, कला शिक्षक गणेश भोईर, वर्गशिक्षिका द्रौपदी वर्तक व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …

Leave a Reply