Breaking News

नागोठण्यातील हौदाची झाली कचराकुंडी

नागोठणे : प्रतिनिधी

एखाद्या पडीक किंवा सरकारी जमिनीवर कचरा तसेच माती टाकून संबंधित जागा कालांतराने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रकार काही वर्षांपासून नागोठणे शहरात चालू आहे. असाच प्रकार शहरातील प्रभुआळीत असणार्‍या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या हौद वजा विहिरीत करण्यात आला असून  हा हौद सध्या पाण्याऐवजी कचर्‍यांनेच भरला आहे. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, येथे कचरा टाकणार्‍या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागोठणे प्रभुआळीतील राम मंदिरासमोर दगडी बांधकाम केलेला एक जुना हौद आहे. या हौदाचे बांधकाम कमीतकमी दीडशे वर्षांपूर्वीचे असल्याचे जुनीजाणती मंडळी सांगतात. वीस वर्षांपूर्वी या हौदातील पाणी काचेसारखे होते व हौशी तरुण त्यात पोहत असत. मात्र, शहरात नागरिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर या परिसरसह संपूर्ण शहरात जागोजागी इमारती उभ्या राहू लागल्या. विशेष म्हणजे याच हौदावर पंप लावून काहींनी यातील पाण्याचा वापर करून बांधकाम पूर्ण केले आहे. शहरात सध्या जमिनीच्या गुंठ्याचा भाव दहा लाखापासून पन्नास लाखांपर्यंत पोहोचला असल्याने भूमाफियांची वक्रदृष्टी ग्रामपंचायतीच्या तसेच सरकारच्या जमिनीवर पडली असल्याने एखाद्या मोकळ्या जागेवर कचरा आणि माती टाकून भविष्यात ही जागा आपल्याकडे घेण्याचा एककलमी कार्यक्रम राबविण्यात त्यांनी यश मिळवले आहे. शहरात ग्रामपंचायत आणि सरकारी जागा जवळपास गिळंकृतच करण्यात आल्या असल्याने मोजक्या जागाच आता शिल्लक राहिल्या आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply