Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये वाहतूक पोलिसांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल तालुक्यात वाहतूक नियमन करणार्‍या 70 वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सचिव मंगेश लाड यांच्या आदेशाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, मच्छीन्द्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply