Breaking News

भाजपतर्फे विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांचा सन्मान

नवी मुंबई : बातमीदार

नेरूळ येथे भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा झाला. यावेळी आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांची उपस्थिती लाभली. निरंत पाटील यांच्या संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रभाग क्रमांक 35 व भाजपाचे माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला. नेरूळ प्रभागातील गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या  घरी जाऊन यथोचित सत्कार करण्याचा शिरस्ता मागील पाच, सहा वर्ष नित्यनेमाने केला जात होता. त्यासोबत यंदा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारदेखील करण्यात आला. या वेळी आमदार गणेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभागातील विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर भोपी, प्रीती भोपी, गणपत बुवा भोपी, देवनाथ म्हात्रे, अक्षय पाटील, जयंत म्हात्रे, सोमनाथ म्हात्रे, प्रितेश पाटील, जयेश ठाकूर, संकल्प पाटील तसेच प्रभाग क्रमांक 35 भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ सदस्य, महिला कार्यकर्त्या तसेच भूमिपुत्र एन्टरटेंमेंट, संकल्प चॅरीटेबलचे सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply