Breaking News

डिकसळ परिसरात डुक्कर मृतावस्थेत; परिसरात दुर्गंधी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या कडेला डुक्कर पाळले जात आहेत. त्यातील एका डुकराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे, मात्र त्या मृत पावलेल्या डुकराला तेथून उचलून नष्ट करण्यात न आल्याने परिसरात तसेच रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

कर्जत-नेरळ रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावाच्या बाहेर नेरळकडे जाताना असलेल्या झाडीमध्ये डुक्कर पालन केले जाते. त्याचवेळी तेथे डुकराच्या मांसाचीदेखील अनधिकृतरित्या विक्री केली जात आहे. तेथे वराह पालन आणि त्याचे मांस विक्री करण्याची कोणत्याही स्वरूपातील परवानगी संबंधित व्यक्तीकडे नाही, मात्र त्या ठिकाणी अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्यवसायाला व मृत डुकर उचलून न नेल्याने उमरोली ग्रामपंचायतीकडूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. याबाबत स्थानिकांकडून आवाज उठविला जात आहे.

याबाबत उमरोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विनोद चांदुरकर यांना विचारणा केली असता, आपली दोन दिवसांपूर्वी अन्यत्र बदली झाली असल्याने आणि नवीन ग्रामविकास अधिकार्‍याची नियुक्ती झाली नसल्याने कोणतीही माहिती मिळाली नाही.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply