पर्यावरणाच्या निरोगी संतुलनासाठी उपक्रम
नवी मुंबई : बातमीदार
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी, एनएसजी कमांडोज मुंबई आणि स्माइल्स फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम घेण्यात आला. नवी मुंबई, खारघर, खालापूर, महाड आणि अमरावती येथे 10 हजार रोपांची लागवड आणि वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी ग्रामस्थ, नागरिक आणि शाळकरी मुलांना त्यांनी मिठाई व फराळाचे वाटप केले. ग्लोबल वॉर्मिंग, मातीची धूप, जंगलतोड यांसारख्या पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणात निरोगी संतुलन राखण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. एनएसजी स्पेशल 26चे कमांडिंग ऑफिसर कर्नल कृपाल सिंग, स्माइल्स फाऊंडेशनचे धीरज आहुजा आणि उमा आहुजा आदी उपस्थित होते. कार्यक्रमात 1000 बावा, 3000 कांचन, 1000 जामुन, 1000 जलुल, 1000 करंद, 1000 फणस, 500 आवळा, 500 पेरू, 500 सीताफळ आणि 500 भेळ अशी 10 हजार रोपे लावण्यात आली.