पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून शनिवारी (दि. 20) बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा होणार आहेत.
20 जानेवारी रोजी कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कुल येथे बुद्धिबळ स्पर्धा, खांदा कॉलनीमधील सीकेटी कॉलेजच्या मैदानावर व्हॉलीबॉल स्पर्धा, 20 ते 21 दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठे येथे कॅरम स्पर्धा; तर 20 ते 21 दरम्यान उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे.
बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजक म्हणून सी.एन. पाटील, प्रवीण बेरा, दामोदर चव्हाण, मनोहर शिंगाडे, व्हॉलीबॉलसाठी माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे व समीर ठाकूर आणि कॅरम स्पर्धेसाठी रमेश खडकर, सदाशिव शिंदे, हर्षवर्धन पाटील, शरद जगताप, सागर ठाकरे, शुभम कांबळे यांच्यावर जबाबदारी आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …