Breaking News

उलवे येथे रायफल क्लबचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

उलवे येथील इंडियन मॉडेल स्कूल व सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालु केलेल्या रायफल क्लबचे उद्घाटन पोलीस उपायुक्त परिमंडल 2चे शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उलवे विभागात हा उपक्रम सुरू केल्याबद्दल व शुटिंग रेंज स्कूलच्या मुलांसाठी मर्यादित न ठेवता सर्वांसाठी खुली ठेवल्याबद्दल इंडियन मॉडेल स्कूल व जुनिअर कॉलेज व सिद्धांत रायफल स्कूलचे आभार मानले. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शनपर संबोधन केले. कार्यक्रमाला स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे डायरेक्टर विकास कोळी, ज्युनिअर कॉलेजच्या प्रिंसिपल डॉ. गौरी शाह, स्कूलच्या प्रिंसिपल वृषाली पराडकर, मास इन्फ्रास्ट्र करचे एमडी महमुद काझी, महाराष्ट्र रायफल संघटनेचे असिस्टंट सेक्रेटरी अनिल रासकर, आयएसएसएफ जज जयंत साळवे, आयएसएसएफ सर्टिफाईड कोच हरेश कांबळे, न्यु इंग्लीश स्कुलचे चेअरमन शरद खारकर, सिद्धांत रायफल व पिस्तूल शूटिंग क्लबचे सेक्रेटरी रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, अध्यक्ष विजय खारकर व प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज अलंकार कोळी, स्कूलचे सर्व शिक्षक व मुले त्यांचे पालक आदी उपस्थित होते. ही शुटिंग रेंज आपल्या स्कुलसाठी मर्यादित न ठेवता सर्व 10 वर्षांवरील विद्यार्थ्यांसांठी व नागरींकासाठी खुली ठेवण्यात आली आहे. स्कूलचे उद्दीष्ट नविन पिढी पुस्तकी ज्ञान पेक्षाही शुटिंग ह्या क्रिडा प्रकारामध्ये सुध्दा करिअर घडवू शकते, अशी माहिती या वेळी क्लबच्या वतीने सांगण्यात आली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply