सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीस
पनवेल : वार्ताहर
तळोजा मधील एका सोसायटीच्या लीफ्टमध्ये महिलेसमोर सोसायटीतीलच एक व्यक्तीने अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे. हा सर्व किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
तळोजा फेस 1 मधील एका सोसायटीच्या लीफ्टमधून एक महिला जात होती. त्यावेळी लीफ्टमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत सोसायटीमध्येच राहणार्या एका व्यक्तीने तिच्यासमोर अश्लील चाळे केले. तसेच दुसर्या एका व्हिडीओमध्ये लीफ्टमधून बाहेर येणार्या महिलेच्या अंगाला हात लावून त्याच व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याचाही प्रकार घडला आहे.
या दोन्ही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोसायटीमध्ये राहणार्या एका व्यक्तीने ट्वीट करुन पोलीसांना टॅग केले आहे. तसेच या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …