Breaking News

रानसई आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

उरण : बातमीदार

उरण तालुक्यातील रानसई वाडीतील रा.जि.प.शाळा रानसई आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी मुला-मुलींना शालेय वस्तूंचे वाटप व खोपटे (बांधपाडा) गावातील विद्यार्थ्यांना आयडी कार्डचे वाटप सुधाकर केशव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सुधाकर ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमात त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारती ठाकूर, निकिता तेजस ठाकूर तसेच रानसई गावातील आदिवासी रा .जि. प. शाळेतील शिक्षिका जान्हवी कडू आणि सुनीता म्हात्रे, गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे निकिता तेजस ठाकूर या स्वतः मेकअपचा व्यवसाय करत असून वर्षभरात त्यांना मिळालेला आर्थिक लाभाचा सदुपयोग समाजपयोगी कार्यक्रमासाठी लागावा या उद्देशाने त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सासू सासर्‍यांच्या हस्ते हा कार्यक्रम राबवून समाजापूढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply