उरण : वार्ताहर
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आयक्यूएसी, अर्थशास्त्र विभाग, करिअर कट्टा व सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचार्यांसाठी गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा आयोजित केली गेली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक गुरुदत्त अजगावकर (प्रशिक्षक, सेक्युरिटी अंड एक्सचेंज ऑफ इंडिया) यांनी सेबी म्हणजे काय, सेबीची गुंतवणुकीत भूमिका, शेअर मार्केट, कॅपिटल मार्केट इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व योग्य गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. वी एस इंदुलकर यांनी इक्विटी मार्केट, शेअर मार्केट पूर्णपणे समजून घेतले पाहिजे व नंतर गुंतवणूक केली पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एच. के. जगताप यांनी केले तर प्रास्ताविक आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण यांनी व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी मानले. कार्यशाळेत वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथील सर्व शिक्षक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.