Breaking News

खोपोलीत 210 किलो गांजा जप्त

खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली हद्दीतील लौजीजवळ एका झायलो गाडीतून 210 किलो गांजा जप्त करण्यात आला. पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गुरुवारी कारवाई ही रात्री करण्यात आली. जप्त केलेल्या गाजांची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
पुण्याकडून मुंबई गोवंडीकडे झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी विभागाला (एनसीबी) खास सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने मुंबई-पुणे महामार्गावरून संबंधित गाडीचा पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहतूक कोंडीत पकडले जाणार असल्याचे गांजा तस्करी करणार्‍या आरोपींना कळताच पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी खंडाळा घाटात खोपोली बाह्यवळणावरून खोपोली शहरातील लौजी परिसरात पळ काढला. एनसीबी टीमने पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, झायलो गाडीमधील एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
आरोपींना खोपोली पोलीस ठाण्यात आणून गांजाचा रीतसर पंचनामा करण्यात आला. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्यासमक्ष चौकशी व तपासणी केली असता झायलो गाडीत जवळपास 25 लाख किमतीचा 210 किलो गांजा  आढळला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply