पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज-1 येथील नाल्यांची सोमवारी (दि. 23) अधिकार्यांसह पाहणी करून आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. पावसाळ्यात पनवेल महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. या अनुषंगाने नगर परिषद हद्दीतील नाल्यांची व ग्रामीण भागांतील नाल्यांची साफसफाईची कामे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत तसेच सिडको वसाहतींमध्येही नालेसफाईची कामे सुरु होणार आहेत. तळोजा फेज-1 येथील पाहणीवेळी स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, उपायुक्त सचिन पवार, भाजप नेते निर्दोश केणी, समीर कदम यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.