Breaking News

रायगडात मंगळवारपासून गौरा गणेशोत्सव

अलिबाग : प्रतिनिधी
अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) साखरचौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन होत आहे. साधारणतः दीड दिवसाच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो.
रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणार्‍या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याला गौरा गणपती असेही म्हटले जाते. अलीकडच्या काळात दक्षिण रायगडातदेखील हा उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे.
गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा काही ठिकाणी अजनूही मुक्काम आहे. असे असतानाच मंगळवारी गौरा गणपतींचे आगमन होणार आहे. पितृपक्षात साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपांत हा उत्सव साजरा होतो.
गौरा गणेशोत्सव कसा सुरू झाला याचा नेमका उल्लेख सापडत नाही, परंतु गणेश कार्यशाळांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत काम चालत असते. त्यामुळे या कारागिरांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. या गणेशोत्सवाला सुरूवात झाल्याचे काहीजण सांगतात, तर काहींच्या मते कोकणात घरगुती गणेशोत्सव साजरा होत असतो. तेथील भक्तांना सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटता येत नाही. ही संधी सर्वांना मिळावी या हेतूने या उत्सवाची सुरुवात झाली.
रायगड जिल्ह्यात गौरा गणपती उत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू झाला. 8 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा अजनूही काही ठिकाणी मुक्काम आहे. असे असतानाच मंगळवारी रोजी गौरा गणपतींचे आगमन होत आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply