Breaking News

खारघरमध्ये स्कूल बसला आग

विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला

पनवेल : वार्ताहर
खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणार्‍या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बसचालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. ही बस ज्या वेळी खारघर सेक्टर 15 येथे आली त्या वेळी बोनेटमधून जळाल्याच्या वास आणि पाठोपाठ धूर निघाला. प्रसंगावधान राखत बसचालक आणि मदतनीस यांनी पटापट सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवले व लांब अंतरावर एकत्रित उभे केले. दरम्यान, बसने पेट घेतला.
याबाबतची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले व त्यांनी आगीवर नियंत्रण अर्ध्या तासात मिळविले. सर्व विद्यार्थी, चालक आणि मदतनीस सुखरूप आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply