नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतररराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (दि. 11) टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा कर्णधार, तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे.
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे.
रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. अर्शदीपलाही संघात जागा मिळाली आहे.
संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
Check Also
आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …