Breaking News

सीकेटी महाविद्यालयात सौंदर्यासंदर्भात जागरूकता कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लॅक्मे अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 10) सौंदर्य क्षेत्रातील जागरूकता याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी खारघर येथील लॅक्मे अकॅडेमीच्या केंद्रप्रमुख शाल्मली करंजेकर प्रमुख अतिथी लाभल्या. महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. शाल्मली करंजेकर यांनी या वेळी रंगभूषेचे आजच्या काळातील महत्त्व, रंगभूषा कशी करावी, रंगभूषा करण्यापूर्वी व नंतर घ्यावयाची काळजी इ. विषयांवर मार्गदर्शन करून रंगभूषा क्षेत्रात नव्याने निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधी याबाबत विस्तृत माहिती दिली, तसेच या वेळी लॅक्मे अकॅडेमीमार्फत रंगभूषेचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निलीमा तिदार यांनी केले. कार्यशाळेसाठी महिला विकास कक्षाचे सदस्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. तसेच या व्याख्यानात  विविध शाखांच्या 111 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर यांनी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply