Breaking News

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशाची पोलीस स्टेशनमध्ये स्थापना करण्यात आली होती. नुकतेच खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील गणेशाचे विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. सतत जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस बांधव दिवस-रात्र आपले कर्तव्य निभावत असतात. गणेशाची स्थापना केल्यामुळे सर्व पोलीस बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विसर्जनाच्या मिरवणुकीत गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता कशी बाळगावी, गुन्हेगारांपासून सावध कसे राहावे, चोरीचा घटना कशा टाळण्यात येतील अशा अनेक बाबी या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस बांधवांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप दिला. सर्व गणेशभक्तांनी मिरवणूक काढताना आनंदमयी वातावरणात सुरक्षित कशी करता येईल ही नेहमी काळजी घ्यावी, असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोकाटे यांनी व्यक्त केले. मिरवणुकीदरम्यान क्राईम ब्रँच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव, शांतता कमिटीमधील पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply