Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी (दि.13) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पेठ गाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विविध औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण डीएलएलई व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डि.एल.ई चे प्रमुख प्रा. महेश धायगुडे व एन.एस.एस प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर, प्रा.रामकृष्ण टोपे, प्रा. सफिना मुकादम, प्रा.महादेव चव्हाण, डॉ.शुभांगी वास्के आदींनी सहकार्य केले. वृक्षारोपणाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

– खेड्यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर

खारघर : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे गुरूवारी (दि. 11) ओवेपेठ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर न्यू. इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत खेड्याचा इतिहास हा कार्यक्रम राबवण्यात आला. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड व डी.एल.एल ई प्रमुख प्रा. महेश धायगुडे व राष्ट्रिय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रथमेश ठाकूर तसेच प्रा. रामकृष्ण टोपे उपस्थित होते. या वेळी प्राचार्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव विषयी माहिती दिली, तसेच प्रा. महेश धायगुडे यांनी शिरढोण खेड्याचा व पनवेल शहरांचा इतिहास सादर केला.

– कामोठ्यात गीत व नृृत्य सादरीकरण

पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार कामोठे येथील नवकार अकॅडमीच्या संचालिका आरती रायसोनी व नवकार फार्माचे संचालक विजय रायसोनी यांच्या संकल्पनेतून कामोठे सेक्टर 36 पोलीस स्टेशन चौक या ठिकाणी नवकार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत तसेच कामोठे पोलीस स्टेशनचे निरीक्षक पाटील, राऊत, सुधीर पाटील आदी उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवकार अकॅडमीमधील शिक्षिका दीपिका ठक्कर, मानसी कदम, प्रीती कोठारी, रवती जंगम, संध्या गायकवाड, राजश्री कदम, सुनंदा मंडळ व शिक्षक अक्षय सर यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम साजरा केला. तसेच कामोठे पोलीस स्टेशनचे मनोज जाधव यांचेदेखील या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply