खोपोली : प्रतिनिधी
कर्जत जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला खोपोली येथील साहित्यिकांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी हितगुज करीत खाऊ व पुस्तकांचे वाटप केले.
र. वा. दिघे यांच्या स्नुषा कवियित्री उज्वला दिघे, नलिनी पाटील, सुधा इतराज व स्वाती जोशी या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमास भेट देऊन आश्रमाच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रारंभी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्या ठमाबाई पवार यांनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील विद्यार्थ्यांनीही पाहुण्यांसमोर कविता व गाणी सादर केली. यावेळी साहित्यिकांनीही स्वरचित कविता गाऊन सादर केल्या. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप केले. व 50 पुस्तकांचा संच आश्रमास भेट म्हणून दिला. आश्रमातील कामकाजाबद्दल पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.