Breaking News

नवीन पनवेलच्या काही भागात अपुरा पाणीपुरवठा

माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांचे सिडकोला निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील सेक्टर 12,13 व 18 या विभागात   काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखली सिडको कार्यालयात बुधवारी (दि. 21) निवेदन दिले आहे.

नवीन पनवेल येथील सेक्टर 12,13 व 18 या विभागात सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून या विभागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरीत नियमित पाणीपुरवठा करावा व जुन्या पाईपलाईन लाईन त्वरित बदलण्यात याव्यात यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखली महापालिकेच्या माजी नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी सिडको कार्यालयात पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांना निवेदन देण्यात आले. श्री. मूळ यांनी लवकरच कामाची सुरुवात होईल, असे आश्वासन देण्यात आलेले आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply