भाजप नेते प्रभाकर घरत यांचे निवेदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर सेक्टर-3 बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरची दुरुस्ती करण्याबाबत भाजप नेते प्रभाकर कमलाकर घरत यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंता (खारघर-1) यांना निवेदन दिले आहे.
खारघर सेक्टर-3 येथील बेलपाडा गावाच्या बाजूला लागून असलेल्या चेंबरमधून रस्त्यावर घाणीचे पाणी वाहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांना होणार्या त्रासाचा विचार करून सिडको प्रशासनाने त्वरीत या चेंबरची दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी कार्यकारी अभियंता (खारघर-1) यांना निवेदन देऊन केली आहे.