Monday , October 2 2023
Breaking News

रायगडात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 2) नव्या 140 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 199 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 20) तालुक्यातील 95, उरण 17, खालापूर आठ, माणगाव सात, पेण पाच, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि कर्जत व तळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील दोन आणि उरण व तळा तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,387 आणि मृतांची संख्या 1609 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54,713 जण कोरोनामुक्त झाले असून,
1065 सक्रिय रुग्ण आहेत.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply