


कामोठे : रामप्रहर वृत्त
हनुमान जयंती शुक्रवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कामोठे व जावळे येथील हनुमान मंदिरास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका कुसूम म्हात्रे, रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, राजेश गायकर, सुधाकर पाटील, बालाराम चिपळेकर, प्रकाश पाटील, विठूशेठ गोवारी, प्रदीप भगत, संतोष भगत यांसह मान्यवर उपस्थित होते.