Breaking News

ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन नेरूळ  येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सेक्टर 10 येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 17) सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 ज्येष्ठांची मोफत तपासणी करण्यात आली. या वेळी अस्थमा, सर्दी खोकला, मधुमेह रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी, तसेच आहार व झोपेबाबत डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला. या शिबिरात भाग घेतलेल्या 30 जेष्ठ नागरिकांना मधुमेहाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे येत्या महिन्यात ज्येष्ठांसाठी हाडांचा ठिसूळपणा, प्रथमोपचार गुडघेदुखी, कंबरदुखी, अपंगत्व या विषयांवर नवी मुंबईत जनजागृतीपर विविध व्याख्याने व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक संघटना व निवासी सोसायटीतील ज्येष्ठांनी संपर्क करावा, असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात …

Leave a Reply