Sunday , September 24 2023

रेल्वे प्रवाशांसाठी व्हीलचेअर, स्ट्रेचरची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्थानिक प्रशासन व प्रवासी संघ यांच्या मागणीवरून लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल (स्टील टाऊन) आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने प्रवशांच्या सुविधेसाठी दोन डोलीकम व्हीलचेअर व दोन स्ट्रेचर रेल्वेस्थानक प्रमुख के. एस. नायर यांच्याकडे मंगळवारी (दि.19) सुपूर्द करण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला, रुग्ण अशा प्रवाशांना  रेल्वेस्थानकातून बाहेर जाणे-येणे सुलभ होणार आहे. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्ष विनया सहस्त्रबुद्धे, कार्यवाह प्रिया कुलकर्णी, सदस्य माधवी कानेटकर, माला दोषी, स्नेहा जुवेकर, लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल (स्टील टाऊन)चे डायरेक्टर बन्सीधर गेरोला, कार्यवाह योगेंद्र सिंग, विश्वस्त यशवंत ठाकरे, सदस्य राजेश कुमार, प्रवासी संघाचे प्रवासी संघाचे अध्यक्ष व रेल्वेस्थानक स्थानिय सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भक्तिकुमार दवे, प्रवासी संघाचे कार्यवाह व उपनगरीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट, रेल्वेस्थानक समितीचे सदस्य डॉ. मनीष बेहेरे, प्रवीण धोंगडे, उपेंद्र मराठे, गौतम अग्रवाल, कार्याध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी के.जी.म्हात्रे, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे, कार्यवाह डी. जी. मगरे, सदस्य आणि रेल्वे प्रशासनामधील स्थानिक अधिकारी उपस्थित होते. उपरोक्त साधनांची मागणी करताना आपले ओळखपत्र  मुख्य स्थानक प्रमुख किंवा त्यांचे सहकारी यांच्याकडे जमा करून साहित्य वापरून झाल्यावर परत करताना ओळखपत्र आठवणीने घेऊन जावे, असे आवाहन डॉ. दवे व बापट यांनी केले. पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना या वेळी स्तबधता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Check Also

उसर्ली येथे लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळा

नागरिकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून …

Leave a Reply