Breaking News

मास्टरमाइंड स्पर्धेत ‘आरटीपीएस’चे सुयश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये (आरटीपीएस) मास्टरमाईंड या वार्षिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 26) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला.
मास्टरमाइंड ही वार्षिक स्पर्धा असून विद्यार्थ्यांना प्रथम शालेयस्तरावर मदत करते. त्यानंतर निवडलेले विजेते राज्यस्तरावर स्पर्धा करतात आणि शेवटी हे सर्व विद्यार्थी संपूर्ण देशात होणार्‍या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मास्टरमाईंड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 238 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 222 पात्र झाले असून राज्यस्तरावर ए व ए+ गुण मिळविले त्यांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे. या विजेत्यांपैकी 41 विद्यार्थी हे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनले आहेत. त्यानुसार 15 विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि 26 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply