आमदार महेश बालदी यांची मागणी
उरण : रामप्रहर वृत्त
उरण येथील करंजा मच्छीमार बंदरात सोयीसुविधांबाबत व इतर प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे मत्सव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
या बैठकीस आमदार महेश बालदी, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. करंजा येथे बांधण्यात आलेल्या मच्छीमार बंदरात सोयीसुविधांची अनेक कामे अपूर्ण आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्यापासून इतर अनेक आवश्यक सेवांची कामे पूर्ण नसल्याने ती लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी या वेळी केली. त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.